महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम 2011 मधील कलम 4 नुसार स्थापन करण्यात आलेल्या पालक शिक्षक संघ व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) नियम 2016 मधील नियम 6 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी समिती शैक्षणिक वर्ष २०२० -२०२1 मध्ये शाळा सुरू होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या संबंधीचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे ज्यांची मुदत समाप्त झाली आहे अथवा शाळा सुरू होण्यापूर्वी समाप्त होणार आहे त्यांनाच वरील आदेश लागू राहणार आहे.त्यांना पूर्वीप्रमाणे सर्वाधिकार असतील. शैक्षणिक वर्ष २०२० -२०२1 सुरू झाल्यानंतर उक्त समिती अथवा संघ नियमाप्रमाणे नव्याने स्थापन करावयाचे आहेत. पालक-शिक्षक संघ आणि कार्यकारी समिती यांची कार्य विना अडथळा पार पाडणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळविण्यात आले आहे.























