वाई : चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना असून बालमजुरी, बालभिकारी, बालविवाह, बाललैंगिक शोषण अशा अनेक विषयांवर गेली ९ वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. बचपना बचाव मानवता बचाओ या मोहिमे अंतर्गत वाई येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘बचपन बचाओ, मानवता बचाओ’ह्या मोहिमेला घेऊन गेल्या ३ वर्षांपासून’ बालभिकारी मुक्त भारत’ झाला पाहिजे. यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी (अवली) तोडकरी हे उपोषणाला बसतात. येत्या दि. २४,२५,२६ डिसेंबर ला सलोनी ताई वाई मधील गणपती घाट येथे उपोषण करणार आहेत, असे कार्यक्रम प्रमुख पुष्कर धुरी ह्यांनी सांगितले.
या उपोषणाच्या निमित्ताने चित्रकला, निबंध, वक्तृत्व, गायन या स्पर्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. आणि त्याचबरोबर या सर्व स्पर्धेची शेवटची दि. २३ डिसेंबर असणार आहे. बालमजुरी, बालभीकारी, बालविवाह, बालपण थांबवा. ह्या विषयाला अनुसरून स्पर्धा होणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावा आणि त्याच्या कला-गुणांना वाव द्यावा असे, संघटनेच्या राज्याध्यक्ष नेहा भोसले यांनी मत व्यक्त केले.



































