सातारा ..येथील श्याम सुंदरी रिलिजिअस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या शानभाग विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनींना covid-19 लसीचा पहिला डोस नुकताच देण्यात आला .यासाठी कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पाचारण करण्यात आले होते. यामध्ये डॉ.रचना सोनीस, यु .एस .वेल्हाळ -एम पी डब्ल्यू, श्रीमती स्वाती पवार. नयना गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक लसीकरण देण्याचे काम पूर्ण केले. पंधरा ते अठरा वयोगटातील महाविद्यालयतील एकूण 204 विद्यार्थी-विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली .यावेळी शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग ,संचालिका सौ .आचल घोरपडे उपस्थित होते .यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेखा गायकवाड यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचना केलल्या या संपूर्ण लसीकरणासाठी आलेल्या टीमचे स्वागत प्राचार्य सौ, रेखा गायकवाड यांनी केले, तर आचल घोरपडे यांनी सर्वांचे आभार मानून यांनी लस घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे, त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन याप्रसंगी केले.