सौ.वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या कु.अविष्कार पवार या विद्यार्थ्याचे कला शाखेत 91.50% गुण.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सौ.वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या कु.अविष्कार विलास पवार या विद्यार्थ्याने कला शाखेत 91.50% गुण मिळवून नेत्रदीपक व दैदीप्यमान अस यश संपादन केलय.
नुकतीच बारावी बोर्ड परीक्षा मार्च 2022 चा निकाल लागला व त्यामध्ये अविष्कारने कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे सर्व स्तरातून त्याच कौतुक होतंय. मुळातच हुशार व अभ्यासाची चिकाटी यामुळे त्याने आतापर्यंत सर्वच परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवलय. केवळ 12 ते 15 तास नुसतच पुस्तक घेऊन रट्टा मारू अभ्यास त्याने कधीच केला नाही,या यशामध्ये शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे.अभ्यासाची योग्य पद्धत काय असते हे शिक्षकांनी सांगितल्याचं अविष्कार सांगतो. मुळातच कला शाखेला काही पालकांचा कल नसतो. आपला मुलगा विज्ञान शाखेला जावा ही इच्छा असते. पण अविष्कारला घरातूनच कला शाखेसाठी पाठबळ मिळाल. प्रेरणा मिळाली. त्यामुळे शिकायलाही त्याला प्रोत्साहन मिळालं.त्यामुळे त्याने प्रत्येक विषय समजून घेतला व संस्कृत सारख्या विषयात त्याला 100 पैकी 100 गुण मिळाले.
या सगळ्या यशाचं श्रेय तो त्याच्या आई बाबांना देतो.अविष्कारला अभ्यासाबरोबर सायकलींची ही फार आवड आहे.अनेक बक्षिसे ही त्याने त्यामध्ये मिळवली आहेत.
या यशाबद्दल सौ. वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य सर्व शिक्षक वृंद तसेच जयंत पाटील (काका) ,संस्थेचे सचिव प्रकाश पाटील (बापू) व राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री मा. ना.बाळासाहेब पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.