सातारा : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे महाबळेश्वर पालिका प्रशासनाने वेण्णालेक बोट क्लब आजपासून (रविवारी) बंद केला आहे.याबाबतची माहिती विठ्ठल जाधव (बोट व्यवस्थापन कर्मचारी) यांनी बोलताना दिलीगेल्या आठ दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. याचा फटका महाबळेश्वर येथील पर्यटनाला बसला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असा वेण्णालेक बोट क्लब महाबळेश्वर पालिका प्रशासनाने आजपासून बंद केला आहे.आज रात्रीपासून पर्यटन स्थळावर कोरोना बाबतची नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी विना मास्क बाहेर पडू नये अन्यथा दंडात्मक कारवाईस सामाेरे जावे लागेल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.