महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
शुक्रवार, दि.२/१०/२०२० रोजी महात्मा गांधी व आय.सी.डी.एस.डे निमित्त बेटी बचावो, बेटी पढावो योजनेंतर्गत ग्रामपंचायत निरवांगी येथील अंगणवाडी केंद्र, निरवांगी – १ येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन बचत गटाच्या अध्यक्षा सोनाली अभिजित पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच किशोरी मुलींच्या वकृत्व स्पर्धा घेवून किशोरींना मार्गदर्शन करण्यात आले. जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यकारी अधिकारी मुंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी उज्वला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सेविका सुवर्णा कुलकर्णी, अंगणवाडी पर्यवेक्षिका एन.एस.तांबोळी , आशा वर्कर बोबडे, व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या






















