
म्हसवड पालिकेच्या प्रशासकीय इमारती लगत बाजार तळावर भरत आसलेल्या जिल्हा परिषद म्हसवड नंबर 3 ही पूर्ण जीर्ण झालेली पालिकेच्या मालकीची इमारत मात्र गेले अनेक वर्षापासून पडलेला स्लॅप, मोडून पडलेले दरवाजे, खिडक्या, फुटलेले पत्रे,वॉल कंपाउंडची भिंतीचा ही काही भाग कोसळला होता रात्रीचे याठिकाणी गैरप्रकार होत होते तर दिवसा लघुशंकेसाठी वापर होत असताना दिसत होता हया सर्व समस्यांच्या तक्रारी घेऊन शालेचे तत्कालीन मुख्याधापक सूर्यवंशी सर व त्यांची संपूर्ण टीम ने ह्या सर्व समस्या श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांचे पुढे मांडल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजेंनी तात्काळ तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांची भेट भेट घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या अवस्थेचा पाढा वाचला परिस्थितीचे गांभिर्य ओळखून श्रीमंत संजीवराजे यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी नगरपालिके मार्फ़त सुमारे 11 लाख रुपयांची तरतूद शाळेच्या इतर दुरुस्ती साठी केली व त्याचा वारंवार पाठपुरावा करून आज शाळेचे संपूर्ण रुपडेपालटून टाकले आहे ह्या मध्ये सर्व वर्गांमध्ये नवीन मार्बोनेटे फरशी, नवीन स्लायडिंग खिडक्या, नवीन लोखंडी दरवाजे, पायर्यांना सर्व फरशी,वॉलकंपाउंड ची भिंत, व्हरांड्यामधील सर्व फरशी, व इतर छोटे मोठे सर्व कामे पूर्ण करण्यात आले आहेत ह्या पूर्ण झालेल्या कामांमुळे शिक्षक, विध्यार्थी, पालकवर्गा मध्ये समाधान आहे.
यावेळी शोभाताई बडवे, (मुख्याध्यापिका.) आर.एल. सूर्यवंशी,दीपांजली पतंगे,सुनील डोंगरे,लक्ष्मण काळे,राजाराम तोरणे,हरिभाऊ माने,सोमनाथ शेटे,कैलास तोरणे,ज्ञानेश्वर हेगडे,ज्योती मुंगळे,मनीषा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.






















