
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य योगेश गुरव ,डॉ.भूषण पवार, प्रा.धर्यशील घाडगे ,रजिस्टार निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर म्हणाले की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे एकमेकांशी सुसंवाद साधताना मराठी भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे भाषेचा सन्मान वाढवणे प्रत्येक मराठी माणसाचे आदय कर्तव्य आहे.
यावेळी उपप्राचार्य योगेश गुरव म्हणाले की संत परंपरेचा वारसा लाभलेला महाराष्ट्र भूमीला मराठी भाषा ही आपली बोलीभाषा वाटते आपल्या भाषेबद्दल प्रत्येकाला गर्व असणे गरजेचे आहे इतर भाषेचा सन्मान करताना आपली मराठी भाषा ही तितकीच महत्वाची ही विसरून चालणार नाही मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी मराठी माणसाने झटले पाहिजे.
प्रारंभी कवी वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने महाविद्यालयात वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले यामध्ये एम फार्मसीच्या काजल जाधव, सायली दळवी, बी फार्मसी मधील शंतनु काळे,शंतनु चकोटो यांनी विजेतेपद मिळविले.
चौकट – महाराष्ट्रात अन्य भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे या समाज घटकाला मराठी भाषेची गोडी व ज्ञान देण्यासाठी एक व्यासपीठाची गरज आहे मराठी माणसाने अन्य भाषिकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे संत ज्ञानेश्वर संत तुकारामाच्या ओव्या बरोबर संत रामदासांनी लिहिलेल्या दासबोधा वाचण्याची गोडी त्यांना लावून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल थोरात यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय निकम ,ओंकार काळे ,ज्ञानेश्वर डुबल यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. रोहन खुटाळे व प्रा. स्नेहा सावंत यांनी केले आभार विजय निकम यांनी मानले






















