महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/फलटण : श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान काळज येथील खंडोबा देवाची यात्रा शनिवार दिनांक 27 व रविवार 28 फेब्रुवारी 2021 रोजीची यात्रा साथरोग नियंत्रण कायदा व 144 कलम लागू केल्यामुळे ही यात्रा रद्द केल्याचे मंदिर प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने संमत करण्यात आले आहे.
ही यात्रा फक्त मानकरी,सेवेकरी व पुजारी इत्यादी मोजक्याच व्यक्तींमध्ये पार पाडली जाईल.या व्यतिरिक्त इतर भाविकांना यात्रेमध्ये सहभागी होता येणार नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यात्रेमध्ये कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही.






















