
यांच्यावतीने आज कराड वेणूताई कॉलेज वर मैदानी क्रीडा स्पर्धा चे भव्य आयोजन करण्यात आले.
श्री शिवाजी शिक्षण मंडळ वेणूताई चव्हाण कॉलेज ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लब याच्या वतीने आज कराडमध्ये भव्य मैदानी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कमी वेळेच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा उभा करण्यात ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लब वेनुताई कॉलेज यांना भरघोस प्रमाणात यश मिळाले .
या कार्यक्रमाला कराड तालुक्यातील विविध शाळा व कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. प्रामुख्याने या कार्यक्रमाला मुलींची उपस्थिती प्रार्थनीय होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामभाऊ कणसे प्रीतीसंगम बँक लि. कराड चेअरमन
यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेची. जनरल सेक्रेटरी श्री प्रकाश बापू पाटील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
प्राचार्य. डॉ. एस.बी. केगार
प्राचार्य डॉ एल .जी .जाधव
मा. डॉ. आर. सी. महाजन
मा.सलीम मुजावर.
पी वी जाधव .संतोष माने.
दिलीप चिंचकर. अध्यक्ष ओलंपिक स्पोर्टस क्लब
या सर्वांचा प्रमुख उपस्थितीत भव्य ॲथलेटिक्स स्पर्धा आज कराडमध्ये पार पडल्या

















