महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : पेंशन थकलेल्या दिव्यांगाना प्रहार कडुन दिलासा आमदार बच्चू कडु यांच्या वाढदिवसा निमित्त कराडला अन्न धान्य व आर्थिक मदतीचे वाटप कराड-दिव्यांगाना अन्न धान्य वाटप प्रसंगी मनोज मशिवाजी चव्हाण, अशोक पवार, भानुदास डाईंगडे व अन्य. शासनाच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारी पेंशन तिन महिन्यांपासुन थकल्याने गोरगरीब दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत आमदार बच्चू कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहारचे मनोज माळी यांच्या वतीने कराड व पाटण तालुक्यातील गरजू दिव्यांगाना अन्नधान्य व अर्थीक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानुदास डाइंगडे, दिव्यांग सेनेचे अशोक पवार, मनोज भैया माळी, बंटी मोरे, श्रीकांत यादव, संदेश जगताप, अजिंक्य कोरे, अवधूत जगताप, आदित्य देसाई, आशुतोष जाधव, सुरज कांबळे, प्रशांत वाघमारे, समीर शेख, अमजद कल्लोर, दीपक वाघमारे, संजय बिहारी आदींची प्रमुख उपस्थीती होती. मनोज माळी म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांगाच्या बाबतीतील काम मोठे आहे. राज्यातील दिव्यांगाना दिलासा मिळावा यासाठी बच्चू कडु यांनी वेळोवेळी आंदोलने करून दिव्यांगांसाठी अनेक शासकीय निर्णय करून घेतले आहेत. याचा लाभ राज्यातील दिव्यांगाना मिळत आहे. मंगळवारी बच्चू कडु यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र बच्चू भाऊ यांचा वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्चाला बगल देत बच्चु भाऊ ज्या दिव्यांगासाठी रांत्र दिवस झगडतात त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शासनाच्यावतीने दिव्यांगाना दर महिन्याला हजारभर रूपयांची पेन्शनच्या रूपाने मदत देण्यात येते. यावरच अनेक दिव्यांगाच्या गरजा भागतात मात्र तिन महिन्यांपासुन हि पेन्शन रखडल्याने अनेक गोरगरीब दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत कराड व पाटण तालूक्यातील गरजू दिव्यांगाना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. तर गरजू दिव्यांगांना अर्थीक मदतही करण्यात आली. यावेळी, शंकर भोसले, सुरज कांबळे, आतिश लोंढे, वनिता फिरंगे, शुभांगी डावरे, अनिता देशमाने, पोपट पोळ, भीमराव वाघमरे, रेखा भोसले, कृष्णा कांबळे व दिव्यांग उपस्थीत होते.