
पाटण तालुका महिला सहकारी पतसंस्था मर्यादित पाटण यांचे वतीने मंगळवार दि. 8 मार्च रोजी श्रीराम पतसंस्था, मोकाशी सभागृह, पाटण. येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सुशांत चोरमले (आरती संस्था फलटण ), दिलीप काळोखे (आरती संस्था फलटण) तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. सुशिलादेवी अमरसिंह पाटणकर ( चेअरमन पाटण तालुका महिला पतसंस्था) यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी सराई कुकर (4 रुपयात चार माणसांचे जेवण तयार करणारे कुकर), बायोगॅस सयंत्र, भाजीपाला पिकाची रोपवाटिका (घरगुती), स्वस्त हरितगृह, ग्रींन हाऊस (घरगुती) पालापाचोळा पासून कांडी कोळसा करणारी भट्टी, ब्लाऊज, पॅटर्न, पापड, शेवया, अगरबत्ती इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यावेळी करण्यात येणार
आहे.
तसेच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झाल्याबद्दल कुमारी समृद्धी नितीन माळी (विहे) हिचा. सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी हळदी कुंकू समारंभ तसेच वाण वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, श्रीमती शशिकला वसंतराव मोटे पतसंस्थेच्या उपाध्यक्ष व अशोक शिंदे व्यवस्थापक व सर्व संचालक यांनी केले आहे.






















