फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेठेची सातारा बाजारपेठेत आवक झाली असून आंबा हंगामाच्या सुरुवातीला दाखल झालेल्या देवगड हापूस आंब्याचा सध्याचा दर १२०० ते १५०० रुपये डझन असून सर्वसामान्य नागरिकांना तो परवडणारा नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. देवगड हापूस आंब्याचा दर सध्या परवडणारा नसला तरी हापूसचा स्वाद मात्र सातारा बाजारपेठेत दरवळताना दिसून येत आहे. (छाया – अनिल गायकवाड)





















