मान्यवरांकडून संजय मोहिते यांना श्रध्दांजली
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करणारे माजी जिल्हा प्रमुख संजय मोहिते यांचे रह्दय विकाराने नुकतेच निधन झाले. अचानक त्यांच्या कुटुंबियांवर आघात झाला . त्याचे सांत्वन करण्यासाठी विविध मान्यवरांनी त्यांच्या कुंटुबाची भेट घेऊन श्रध्दांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र राज्यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेनेचे तात्कालिन लोकसभा उमेदवार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, कोरेगांवचे आमदार महेश शिंदे, राज्य नियोजन अध्यक्ष व मा. आमदार राजेश
क्षीरसागर,विद्यमान सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार , हर्षद कदम, राजेंद्र माने , तालुका प्रमुख नितीन काशीद – पाटील , उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव , दिलीप यादव , संजय चव्हाण ,शशीराज करपे , अक्षय गवळी ,विभाग प्रमुख प्रविण लोहार , धनाजी पाटणकर शाखाप्रमुख भार्गव शिंदे , बाबू नाईक , पिंटू बोडरे , अमित पवार , विश्वास पवार, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार , दिपक मुट्टल, महेश पाटील, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.