महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
वादळी वारा व अवकाळी पावसामुळे मौजे शहापूर ता. कराड येथील घरांचे, तसेच जनवारांचे गोठे, बागायत़ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहापूर येथील नुकसान झालेल्या घरांची, गोठ्यांची, पाहणी कराड चे तहसीलदार श्री. विजय पवार यांच्यासमवेत पाहणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार पवार यांना नुकसानग्रस्त लोकांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी विनंती केली. माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या वतीने मागणी करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बाबा पवार,संजय गोडसे दत्ता शेलार ,दत्ता काशीद,बाळासो जनार्दन पवार, शंकर पुजारी, विजय बाबर, ताजुदीन मुल्ला, भास्कर पाटील,सदाशिव शेलार, प्रशांत जाधव,दत्ता शेडगे,राजेंद्र शेलार,आबासो चव्हाण,दादासो पवार,प्रमोद नामदास, विकास जाधव व शहापूर ग्रामस्थ उपस्थित होते.