महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाइन प्रशिक्षणासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका निवेदनाद्वारे कळवले आहे.
आगामी निवडणुकांच्या संदर्भात 2 मार्च 22 रोजी पूर्वतयारीसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने टू व्होटर ॲप (True Voter App) सुरू केले असून पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे ॲप वापरणे अनिवार्य होणार आहे. त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून सदर ॲप्स चा वापर कसा करावा यासंदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि उमेदवार यांना प्रशिक्षण घेण्याबद्दल सूचना केलेली होती. त्यानुसार रविवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी बारा वाजता झूम कॉल द्वारे एक तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे याची नोंद घेऊन होणाऱ्या सदर प्रशिक्षणास जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहरअध्यक्ष यांना देखील आपल्या स्तरावर प्रशिक्षणास उपस्थित राहण्यास सूचना करण्यात यावी असे कळविण्यात आले आहे.या पत्राच्या प्रतीजिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदींना पाठवण्यात आलेले आहे त्या पत्रामध्ये झूम लिंक पाठवण्यात आलेली आहे.