महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोळकी 17मार्च
सुरवडी ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या आवारातून सुमारे एक कोटी 61 हजार किमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेले असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे
त्यानुसार 1 एप्रिल 19 ते ऑक्टोबर 19 या कालावधीमध्ये टाटा कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड सुरवडी ता. फलटण जि. सातारा येथील वेअर हाऊस मध्ये तसेच असेंबली विभागांमध्ये ठिकाणी ठेवण्यात आलेले एक कोटी 60 लाख 57 हजार 35 रु. किमतीचे इंधन इंजेक्टर चोरून नेल्या प्रकरणी अज्ञातां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये बॉश कंपनीचे 52 95 060 या मॉडेलचे 632 नग तसेच बॉश कंपनीचे 530 60 50 या मॉडेलचे 325 नगआणि कमिन्स कंपनी चे 43 84 619 या मॉडेलचे 628 नग आणि कमिन्स कंपनी चे कमिंस 43 84 786 या मॉडेलचे 586 चोरीस गेले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुरप्रीत बक्षीस भुल्लर महाव्यवस्थापक यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे