पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच शासकीय वन्यजीव उपचार केंद्र वराडे, ता.कराड येथे मंजूर मा. नामदार श्री बाळासाहेब पाटील.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सहकार मंत्री मा.नामदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून वराडे, ता. कराड येथे वन्यजीवांवर उपचार व देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक असे ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर (टी.टी.सी.) वन्यजीव उपचार केंद्र मंजूर. त्यासाठी प्राथमिक अंदाजपत्रकानुसार रक्कम रूपये ७ कोटी ५८ लाख निधी वर्ग. या केंद्रासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
मा. नामदार वराडे, तालुका-कराड येथे वन्यजीवे उपचार केंद्र मंजूर करणेबाबतची मागणी श्री बाळासाहेब पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने या केंद्रासाठी रक्कम रूपये ७ कोटी ५८ लाख रक्कम उपलब्ध करून देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अत्याधुनिक उपचार पध्दतीचे सुसज्ज असे ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर (टी.टी.सी.) मंजूर झाले असून कोल्हापूर, सांगली व कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील वन्यजीवांच्या लवकरात लवकर उपचारासाठी व देखभालीसाठी वराडे, ता.कराड येथे आणता येणार आहे.जंगलात वावरणाच्या वन्यजीवांना पाळीव जनावरांच्या दवाखान्यात उपचार केल्यास पाळीव जनावरांच्या रोगांची लागण त्यांना होवू शकते. त्यामुळे या वन्यजीवांसाठी वेगळे उपचार करण्याची गरज भासते. वन्यप्राण्यांवर उपचार करताना कमीत-कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासामध्ये सोडणे आवश्यक असते. या दृष्टीने आवश्यक उपचार पध्दती की रेडिओ थेरपी, पोर्टेबल एक्सरे या सारख्या अद्यावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. सदर उपचार केंद्रामध्ये मांस भक्षी प्राणी-पक्षी, तृणभक्षी प्राणी-पक्षी व जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळे पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून याठिकणी त्यांना आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक अधिवासाशी मिळते-जुळते असे वातावरण तयार करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी महाराष्ट्रात ठिकठिकाणी वन्यजीवांच्या उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्यासाठी घोषणा केली. सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून जागेच्या निवडी पासून ते नकाशा तयार करणे पर्यंत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.सहकार मंत्री मा.नामदार श्री बाळासाहेब पाटील यांनी वेळोवेळी उपयुक्त सूचना करून पश्चिम महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरेल असे वन्यजीवांच्या आधुनिक उपचार केंद्राला निधी तातडीने मंजूर करावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री सुनिल लिमये यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणी खाली असणाऱ्या राज्य कॅम्पा योजनेतून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हे वन्यजीव उपचार केंद्र उकृष्ट दर्जाचे व अत्याधुनिक साहित्याने परिपूर्ण असणार आहे.या कामी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री सुनिल लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, क्लेमेंट बेन, मुख्य वनसरंक्षक श्री एम. रामानुजम, उपवन संरक्षक श्री महादेव मोहिते, मानद वन्यजीव रक्षक श्री रोहन भाटे, श्री नाना खामकर यांचे सहकार्य लाभले.