महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ;बारामती
पावसाळ्यात या मेंढ्यां गढूळ पाणी व नवीन चारा या सोबत किडे आळ्या पोटात जाऊन जुलाब पोटफुगी या सारखे रोग उद्भवतात व मेंढ्याचा मृत्यू होतो. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नियमानुसार (एचएस सँनेसीपी) याचा डोस देणे गरजेचे असते. त्यासाठी स्थानिक वेटनरी डाँक्टर सोधून डोस देण्याची लगबग मेंढपाळ करीत आहेत.
जंक्शन परिसरात सातारा जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील सुपे भागातील असंख्य मेंढपाळ इंदापूर तालुक्यात दाखल झाले आहेत. जून महिन्यात या परिसरात दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस झालेला आहे. झालेल्या पावसामुळे खुरटे नवीन गवत उगवून आले आहेत. त्यामुळे मेंढ्यांना चारा उपलब्ध झाला आहे. हा नवीन चारा खाताना चार्यासोबत किडे आळ्या सहज खालले जाते व पोटफुगी या सारखे आजार होऊन मेंढ्याचा मृत्यू होतो. मेंढपाळांना दर पावसाळ्यात अशा आजाराने शेकडो मेंढ्या दगावत असल्याने लाखो रूपयला फटका बसत असतो.
मेंढ्याची होणारी हानी थांबवण्यासाठी पावसाळ्यात मेंढपाळ स्वतःच्या स्वखर्चातून डोस खरेदी करून अनुभवी वेटनरी डाक्टर यांच्याकडून डोस देण्यासाठी धावपळ पावसाळ्यात करावी लागते .तर हिवाळ्यात सर्दी उन्हाळ्यात गरमी यापासून मेंढ्याना सुरक्षितता मिळण्यासाठी डोस द्यावा लागतो एका मेंढीला डोस देण्यासाठी वेटरनेरी डाँक्टर १० ते २० रूपये घेतो. अशी माहिती तुकाराम यशवंत केसकर सुपे यांनी दिले .