सोळशी ( ता . कोरेगाव ) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्व १३ जागांवर विजय मिळवला . त्यांचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता . त्यामुळे प्रत्यक्ष १२ जागांसाठी मतदान झाले . विरोधी पॅनेलला एकही जागा मिळाली नाही . मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा विश्वास दखवला . श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते : सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी- बाळासाहेब ह . सोळस्कर ( २१६ ) , सतीश देशमुख ( २१३ ) , रवींद्र यादव ( २०८ ) , जितेंद्र सोळस्कर ( २०६ ) , प्रतापसिंग यादव ( २०४ ) , बाळासाहेब खा . सोळस्कर ( २०२ ) , हुमदेव पवार ( २०० ) , शामराव सोळस्कर ( १ ९ ३ ) . महिला राखीव सुशीला सोळस्कर ( २०८ ) , शोभा सोळस्कर ( २०६ ) . अनुसूचित जाती – जमाती प्रवर्ग- जगन्नाथ आवाडे ( २१७ ) . इतर मागास प्रवर्ग – विनायक पिसाळ ( २१३ ) . भटक्या विमुक्त प्रवर्गातून पंढरीनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल . एन . घनवट यांनी काम पाहिले . विजयी उमेदवारांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर , आमदार दीपक चव्हाण , आमदार शशिकांत शिंदे , आमदार मकरंद पाटील , नितीन पाटील , मंगेश धुमाळ , संजय साळुंखे यांनी अभिनंदन केले .