महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, या मागणीसाठी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या वतीनं आज येथील दत्त चौकात आंदोलन करण्यात आलं.सोमय्या यांच्या पोस्टरवर प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं. भ्रष्ट सोमय्या हाय हाय.., निषेध असो निषेध असो.. किरीट सोमय्यांचा निषेध असो.., सोमय्या मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी तालुका प्रमुख नितीन काशीद, कऱ्हाड शहर प्रमुख शशिकांत हापसे, ग्राहक कक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, अजित पुरोहीत, उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव, साजीद मुजावर, शेखर बर्गे, दिलीप यादव, कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख सतीश पाटील, दक्षिण तालुका उपप्रमुख सुनिल पाटील, जिल्हा महिला संघटिका अनिता जाधव, कऱ्हाड उत्तर महिला संघटिका विद्या शिंदे, मधुकर शेलार, शंभूराज रैनाक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.






















