फडतरवाडी विकास सेवा सोसायटीत सत्तांतर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा; विरोधी पॅनेलचा ८-४ ने उडवला धुव्वा
सातारा- सातारा तालुक्यातील फडतरवाडी विकास सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या ठरलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी नवसरी माता शेतकरी पॅनेलचा ८-४ अशा फरकाने धुव्वा उडवून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंराजे भोसले गटाच्या अजिंक्य परिवर्तन पॅनेलने सत्ता काबीज केली.
सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी खा. उदयनराजे गटाच्या नवसरी माता शेतकरी पॅनेल विरोधात आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या अजिंक्य परिवर्तन पॅनलमध्ये काट्याची लढत होती. निवडणुकीत अजिंक्य पॅनेलने ८ जागांवर विजय मिळवून सोसायटीत सत्तांतर केले. अजिंक्य पॅनेलचे सुरेश कणसे, नाथाजी चव्हाण, जोतिराम केंजळे, सुभाष चव्हाण, अर्जुन पिसाळ, रामचंद्र ढाणे, सुरेखा घाडगे, चंद्रभागा मुंढे हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अजिंक्य परिवर्तन पॅनेलचे प्रमुख बबनराव चव्हाण, चंद्रकांत कणसे, संजय चव्हाण, नंदकुमार कणसे, दादासो कणसे, महेश मुंढे, दिलीप चव्हाण, मोहन कणसे, शैलेंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधा. सोसायटीच्या प्रगतीसाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी दिला.
































