शिवसेना पाटण तालुका, व शिवसेना पाटण शहराच्यावतीने रवी राणा, नवनीत राणा, किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा. निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांचा अवमान प्रकरणी रवी राणा, नवनीत राणा, किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा. यासाठी तहसीलदार पाटण, पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सर्व शिवसेना पाटण तालुका पदाधिकारी व शिवसेना पाटण शहर पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व आजी-माजी शिवसैनिक उपस्थित होते.




















