लोणंद प्रतिनिधी/
पोलीस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणारे आणि विशेष कार्य केलेले सातारा जिल्हा पोलीस दलातील लोणंद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कराड शहर, कराड तालुका, भुईंज, खंडाळा, अँटी करप्शन सातारा इत्यादी ठिकाणी सेवा बजावून आपल्या विशेष कार्यातून आज पर्यंत १०८ पुरस्कार मिळवून पोलीस दलात नावलौकिक करणारे सहाय्यक फौजदार महेश सपकाळ यांना दिनांक १ मे रोजी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार महेश सपकाळ यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.