नागठाणे :-प्रतिनिधी
येथील फुटबॉल खेळाडू स्नेहल संतोष घाडगे हिची मुंबई येथे झालेल्या कॅम्पमधून महाराष्ट्र
वरिष्ठ महिला फुटबॉल संघात
निवड झाली आहे.
हिमाचल प्रदेश येथे मंगळवार, दि. २१ पासून
सुरू होणाऱ्या स्पर्धेत ती महाराष्ट्राच्या संघातून खेळणार आहे. या निवडीबद्दल खा.छ.उदयनराजे भोसले,आ.शिवेंद्रसिहराजे भोसले,भाजपा प्रदेशचे विक्रम पावसकर,जि.प.सदस्य मनोजदादा घोरपडे, तसेच सातारा जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने धनंजय जाधव, सुधाकर शानभाग, वृषालीराजे भोसले, सुरेश साधले, प्रा. डॉ. शिवराज गायकवाड, धैर्यशील कुंकले, प्रा. गौरव जाधव, अमित उघाडे, प्रा. अभिजित कदम, अमोल कदम, रामनाथ वायफळकर,सदस्य तसेच सरपंच शुभांगी घाडगे,उपसरपंच राजेंद्र घाडगे व कामेरी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे