सातारा प्रतिनिधी – जरंडेश्वर शुगर मिल्स चिमणगाव ता. कोरेगाव येथील कारखाना प्रशासनाने आज ३००० /- रुपये दर जाहीर केला. आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितकारक मानला जाणाऱ्या ज्या कारखान्याच्या ऊस दराकडे शेतकरी आस लावून बसला होता त्याच कोरेगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाचा दर ३०००/- रुपये जाहिर केला याबद्दल रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज जरंडेश्वर साखर कारखाना संचालक मंडळाचे मनस्वी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात आज रयत क्रांतीच्या लढ्याला उत्तम प्रकारे यश आले असे आपण म्हणू शकतो. याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव आणि युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे उर्फ (सोनू) म्हणाले खऱ्या अर्थाने आज पर्यंत सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी दर जाहिर केले परंतु सर्वात जास्त दर देण्याऱ्या कारखान्यांमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्स चिमणगाव ता. कोरेगाव साखर कारखाना हा कायम अग्रेसर राहिला आहे. आज खऱ्या अर्थाने आश्वासक दर हा जरंडेश्वर कारखान्याकडून जाहिर करण्यात आला त्यामुळे आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आजच्या महागाई मध्ये थोडासा दिलासा नक्कीच मिळेल. आज पहिली उचल तीन हजार रुपये कार्यकारी संचालक मंडळ यांनी जाहीर केलं या निर्णयाचे स्वागत रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले. यानंतर सविस्तर चर्चा सुद्धा झाली यामध्ये संचालक मंडळाने म्हटलं आहे की उर्वरित रक्कम हंगाम पूर्ण झाल्यानंतर आम्ही पूर्ण करू असे आश्वासन रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आज अखेर जी जिल्ह्यामध्ये आंदोलन केली त्याला आज चांगल्या प्रकारचे यश आज लाभले असा आपण म्हणू शकतो. संघटनेच्या वतीने आज जरंडेश्वर साखर कारखाना प्रशासनाचे फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, शरद राक्षे, भास्कर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




















