मौजे घोणशी ता.कराड येथे राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच घोणशी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते तसेच कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ.अतुल भोसले भोसले(बाबा) व विधानपरिषदेचे माजी सदस्य आनंदराव पाटील(नाना) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला.यावेळी जुने गावठाण येथे मारुती मंदिरासमोरील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, जानाईदेवी मंदिरासमोरील जागेमध्ये करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचे उद्घाटन, संरक्षक भिंतीचे भूमिपूजन, तसेच नवीन गावठाण येथे श्री निवास रामचंद्र पाटील यांच्या घरापासून ते शंकर राजाराम पाटील यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचे भूमिपूजन, मुख्य चौकातील लॅम्पचे उद्घाटन, वॉटर ए. टी. एम.चे उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, शामराव पाटील(आण्णा), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव,शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), झुंजारराव पाटील, लिंबाजीराव पाटील, ऍड.राजाभाऊ उंडाळकर, युवा नेते सागर पाटील, कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, सुनील पाटील, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), ऋतुजा पाटील-वाठारकर, जयवंतराव साळुंखे, शंकरराव खापे, नंदकुमार बटाणे, संभाजीराव गायकवाड, तानाजीराव साळुंखे, कांतीलाल पाटील, ऍड.शामराव देशमुख, दयानंद पाटील, मोहन पाटील, मनोज डांगे, अनुज पाटील, आनंदराव पिसाळ(गुरुजी), माणिकराव पाटील, सरपंच सुवर्णा अडसूळे, उपसरपंच संजय हिंदुराव पिसाळ, किसनराव पाटील(गुरुजी), संभाजी पिसाळ, संजय आत्माराम पिसाळ, प्रमोद पाटील, निवासराव पाटील, शशिकांत वायदंडे मधुकर पिसाळ, विलास पिसाळ, शिवाजी पिसाळ, अशोक थोरात, धनाजी पाटील, राहुल पाटील, नारायण पिसाळ, लक्ष्मण थोरात दिनकर वायदंडे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कराड उत्तर गिरीश सावंत, उपअभियंता प्रताप पवार, हुद्दार, ए. पी.आय जयश्री पाटील तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी – माजी संचालक, जिल्हा परिषद -पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






















