महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इंदापूर :
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रविवार दि. ६ रोजी जोराचा वारा , विजांचा कडकडाटत सुमारे चार ते साडेचार तास पाऊस झाला. यामुळे या परिसरातील ऊस , मका व बाजरी पीकांचे मोठे नुकसान झाले.
नुकत्याच झालेल्या धो धो पावसामुळे वालचंदनगर , निमसाखर , शिरसटवाडी , निरवांगी , दगडवाडी व खोरोची सह अन्य भागात जोरदार पावसाने झोडपले. दरम्यान पावसाने बय्रापैकी उघडीप दिल्याने या परिसरातील ओढे नाले पाण्याने वाहणे बंद झाले होते. याचबरोबर शेतकय्रांच्या शेतातील पीकांही पाण्याची गरज होती. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस त्यात वारा यामुळे शेतकय्रांच्या शेतातील ऊस , बाजरी व मका हि परिपक्व झालेली पीके भुईसपाट नुकसान झाले आहे.यामुळे वालचंदनगर व इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकय्रांच्या भुईसापाट झालेल्या पीकांचे महसुल खात्याने पंचनामे करण्याची या भागातील नागरीकांनी केली आहे.
सध्या नुकत्याच झालेल्या पावसामुळे माझे ६ एकर ऊसाचे व साडेतीन एकर मका भुईसपाट झाली आहे. यामुळे महसुल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी वालचंदनगर येथील शेतकरी कुमार गायकवाड यांनी केली आहे.