कराडचे सुपुत्र प्रमोद काळे यांना उपमुख्य कार्यकारी संवर्गात पदोन्नती
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : आटके ता कराड गावचे सुपुत्र व विशेष कार्य अधिकारी (ऑफिसर ओन स्पेशल ड्युटी ) मा. मंत्री (सहकार) मंत्रालय मुंबई यांचे प्रतिनियुक्तीवर असणारे प्रमोद काळे यांना उप मुख्य कार्यकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली. नुकतीच राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील ७२ गटविकास अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना सिलेक्शन ग्रेड मध्ये पदोन्नती देत उपमुख्य कार्यकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली. यामध्ये आटके गावचे सुपुत्र असणारे प्रमोद काळे यांचाही समावेश आहे.
प्रमोद काळे यांनी यापूर्वी खालापूर व बारामती या ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे सध्या ते सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी मंत्री (सहकार) मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. पदोन्नती मिळाल्यामुळे प्रमोद काळे यांच्यावर सामाजिक राजकीय, आर्थिक तसेच विविध स्तरातून व आटके ग्रामस्थांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे