महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (फलटण)
11 सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील 63 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या होकारात्मक आल्या आहेत. यामध्ये शहरातील 29 व्यक्ती तर ग्रामीण भागातील 34 व्यक्तींचा समावेश आहे. एक व्यक्ती मृत्यू पावली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
फलटण शहरात मलटण, लक्ष्मी नगर, पद्मावती नगर, विद्या नगर, शिवाजीनगर, भडकमकर नगर, बारव बाग , रविवार पेठ आदी ठिकाणी रुग्णांच्या चाचण्या होकारात्मक आल्या आहेत. ग्रामीण भागातील खटकेवस्ती,विडणी प्रत्येकी 6, कोळकी 5, पिंपरद 3 मिरेवाडी 5 ,आसू , सस्तेवाडी, साखरवाडी ,माळेवाडी,कालढण जिंती येथे प्रत्येकी 1 असे 34 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. शिवाजी नगर फलटण येथे 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.