महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : 21 जून जागतिक योग दिन देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृती मधील सर्वात महत्त्वाचा योग संपूर्ण जगापर्यंत पोहचवला. योगा सर्वांच्या हिताचा आरोग्याचा आहे. 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास जगास भाग पाडले आहे युवकां पासूनवयोवृद्ध या माध्यमातून निरोगी जीवन जगण्याची एक कला या भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेले आहे आज भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीने कराड शहरामध्ये सर्व योग प्रेमींना एकत्र घेऊन आज योग दिन साजरा करण्यात आला यावेळी कराड शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रेमी व नाशिक विद्यापीठचे नेनमल ओसवाल भारतीय जनता पार्टी कराड शहर चे अध्यक्ष एकनाथ बागडी, उमेश शिंदे, नितीन वास्के विश्वनाथ फुटाणे, रुपेंद्र कदम, राजू व सर्व योग प्रेमी आज एकत्र येऊन योग दिन साजरा केला