पद्मावती इंटरनॅशनल आणि स्पिरिच्युअल यांच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ज्योतिष महा संम्मेलन आयोजित केले होते यामध्ये ज्योतिषाचार्य योगेश्वर महाराज यांना ज्योतिष वास्तुशास्त्राचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल “ज्योतिष गूढ विज्ञान आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती” हे महाराष्ट्रातील प्रथम श्रेणीचे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
योगेश्वर महाराजांचे आज मोठ्या प्रमाणावर देश व विदेशात शिष्य आहेत आणि त्यांनी जय योगेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ते मोठ्या प्रमाणावर ज्योतिष शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.योगेश पवार उर्फ योगेश्वर महाराज हे पिंगळी बु।ता.माण, जि.सातारा या छोट्याशा गावचे रहिवाशी असून त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अतिशय गरीब हालाखीच्या परिस्थितीत पिंगळी येथील जय भवानी विद्यालयामध्ये पूर्ण झाले. आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्यांना दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयात बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी पाठवलं.
त्यानंतर महाराजांनी बीसीए कम्प्युटरची डिग्री घेऊन रत्नागिरीमध्ये आले. नंतर त्यांनी स्वतः खेड(रत्नागिरी)येथील रेल्वे स्टेशनवर चहा ,वडापाव विकून त्यांनी पुढे एमबीए (Marketing & Investment) मध्ये शिक्षण पूर्ण केले.
तदनंतर त्याना अध्यात्माचे वेड लागले. त्यांनी ज्योतिषविषयक ज्ञान त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे घेतले. पुढे त्यांनी असंख्य साधू-संत यांना भेटून पूर्ण भारतभर प्रवास करून वेगवेगळी विद्या अवगत केली. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून महाराजांनी ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसार सुरू केला.
तेरा वर्षे त्यांनी ज्योतिषी म्हणून रत्नागिरी खेड या ठिकाणी कार्य केले. पुढे त्यांनी 2018 मध्ये “जय योगेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट” रत्नागिरी येथे स्थापन केली. त्याचबरोबर त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून अध्यात्माचे ज्ञान प्राप्त केले.
अशा हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या ज्योतिषाचार्य म्हणून नावारूपास आलेल्या योगेश्वर महाराज यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करतेवेळी या पुरस्कार सोहळ्यामध्ये नामांकित ज्योतिष तज्ञ डॉ.एच. एस.रावत,अनिल वत्स, डॉ.अजय भांबे आणि श्री श्री १००८ सौरभ राघवेंद्र महाराज ,आचार्य पंडित, विजय दत्ता, डॉ. मोनिका करल, ईशानी पटेल आणि देश-विदेशांमधील 250 ज्योतिषी यामध्ये उपस्थित होते.या सम्मेलनाचे आयोजन आचार्य सुब्रह्मण्यम अय्यर यांनी केले होते.