आधुनिक युगात महिलांची ओळख बदलली असुन ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन यशस्वी उद्योजिका व्हावे त्यासाठी कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रयत्न करावे त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबध्द असल्याची ग्वाही श्रीनिवास पाटील फाऊंडेशन उपाध्यक्षा रचना पाटील यांनी दिली. चोराडे ता.खटाव येथे ग्रामपंचायत व उमेद अभियान पंचायत समिती खटाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गट कार्यशाळेत त्या बोलत होत्या,यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, पंचायत समिती सदस्या रेखा घार्गे, बॅक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक जितेंद्रकुमार,वरीष्ठ ऋण प्रबंधक प्रवीण चाटे,उमेद अभियान तालुका व्यवस्थापक ॠषीकेश जाधव,अविनाश काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.रचना पाटील पुढे म्हणाल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला भगिनी भरारी घेऊ पाहत आहेत.त्यांना प्रोत्साहनासोबतच नवनवीन कौशल्य व विविध पातळ्यांवर प्रशिक्षण मिळाल्यास आत्मविश्वासाने त्या प्रभावी वाटचाल करू शकतात. त्यादृष्टीने अशा कार्यशाळांचे आयोजन महत्त्वाचे असुन श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने अशा महिलांना उद्योजकीय व्यासपीठ व त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘सातारा महिला अॅग्रो’ची स्थापना करण्यात आली असुन त्यामाध्यमातुन महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.यावेळी बॅक प्रबंधक जितेंद्र कुमार,प्रवीण चाटे,ऋषीकेश जाधव,अविनाश काशीद यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सुहास पिसाळ,सरपंच कृष्णत पिसाळ,उपसरपंच सुधाकर कुंभार,नितीन कुलकर्णी, सीआरपी सिमा पिसाळ, सविता साळुंखे,आबासो काशीद ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा पिसाळ तर आभार इंताज मुल्ला यांनी मानले.
चोराडे ता.खटाव येथे दिपप्रज्वलन करुन महिला बचत गट कार्यशाळेचा शुभारंभ करताना रचना पाटील,जयश्री कदम व अविनाश काशीद मान्यवर
५० महिलांना ५० हजाराचा मोफत अपघात विमा:-कार्यक्रमास सुमारे चारशे महिलांची उपस्थिती होती या महिलातुनच ५० महिलांना लकीड्राॅद्वारे चिठ्ठी काढुन प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मोफत अपघात विम्याची भेट देण्यात आली.






















