नवारस्ता प्रतिनिधी : संत गोरोबा काका मंदीर कुंभारगल्ली पाटण येथे पाटण तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी तालुक्यातील ओबीसी बांधवानी व नवयुवक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन पाटण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सुतार यानी केले आहे. या मेळाव्यात तालुका संघटनेची कार्यकारणी निवडली जाणार असून पाटण तालुका विभागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. या मेळाव्यास मार्गदर्शन करणेसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे

अध्यक्ष मा. भरत लोकरे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात या ठिकाणी चर्चासत्र होणार असून विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील आजी माजी ओबीसी सदस्य, व कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आवाहन चंद्रकांत सुतार यांनी केले आहे.






















