प्रवक्ता निवडीसाठी यूथ काँग्रेसची “यंग इंडिया के बोल” स्पर्धा :शिवराज मोरे यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची निवड करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतला आहे. खासदार राहुलजी गांधी यांचे मार्गदर्शन व भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा आलवारूजी व युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी. व्ही, राष्ट्रीय प्रवक्ते व या स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रभारी जयेश गुरणानी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रवक्त्यांच्या निवडीसाठी युवक काँग्रेसने ‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचेआयोजन केले असल्याची घोषणा शिवराज मोरे यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत केली.कॉंग्रेस पक्षाचे विचार व विचारधारा सर्व सामन्यापर्यंत पोहोचावी.व नव्या पिढी मध्ये नेतृत्व निर्माण व्हावे.. युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना युवक काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती मिळणार आहे, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी दिली.
याच पद्धतीने राज्य व राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी निःपक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचांची नेमणूक करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे अमित जाधव निलम येडगे, समीर पटवेकर, अजित पवार देवदास माने, अमोल नलवडे, रोहित पाटील, प्रमोद माने, दिग्विजय पाटील, शिवराज पवार, नरेंद्र पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
या स्पर्धेच्या नाव नोंदणी आणि इतर माहितीसाठी युवकांनी अजित पवार जिल्हा सरचिटणीस युवक काँग्रेस सातारा यांच्याशी 8605386373 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे व अमित जाधव यांनी केले आहे.