लोक जनशक्ती पार्टीचे आंदोलनाचा इशारा
सातारा :- कण्हेर जलाशयाजवळील मौजे आकले हद्दितील गट नं 62 मधील 20 गुंठे क्षेत्रामध्ये अनाधिकृतरित्या हाॅटेल व्यवसाय बंद करण्याबाबत आज सातारा तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले .
कण्हेर जलाशयाजवळील मौजे आकले हद्दितील गट नं 62 मधील क्षेत्र 20 आर कृष्णा सिंचन विभागाकडून सादर जागा भाडेपट्टी करारावर बाजीराव कापसे (रा माळेवाडी) खानवळीसाठी जागा घेतली होती मात्र खानवळीच्या नावाखाली जलसागर नावाचे व्हेज, नाॅनव्हेज अलिशान रेस्टॉरंट सुरू केले आहे. पक्के बांधकाम करून कृष्णा सिंचन विभागाकाची जागा बळकवलेली आहे . राजकीय दबाव आणि भ्रष्ट आधिकारी यांना हाती धरून गेले 11 वर्षे कोणत्याही परवानगी न घेता अनाधिकृत हाॅटेलचा व्यवसाय सुरू ठेवला आहे .तसेच 11 वर्षे लाखो रुपयांचा महसूल बुडवलेला आहे. पाठीशी घातलेल्या आधिकाऱ्याची चौकशी करून संबंधितांना निलंबित करावे आणि अनाधिकृतरित्या सुरू असलेला हाॅटेल व्यवसाय बंद त्वरीत बंद करावा अन्यथा स्वातंत्र्यदिनी दि.15 ऑगस्ट 2021 तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे निवेदन सातारा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आले आहे .
या वेळी लोक जनशक्ती पार्टीचे युथ जिल्हा उपाध्यक्ष रणजित कसबे , तालुका अध्यक्ष जावेद मुलानी, कार्याध्यक्ष कीरण गायकवाड , बालाजी अडसूळ , जय पवार , अजय पठाण, सूरज कदम उपस्थित होते.





































