पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी
सोळशी ता.कोरेगाव येथील बुद्धीविहाराचे उद्घाटन व किसनविर कारखाना भुईंजच्या शेअर्स खरेदी संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम सोळशी येथे रविवारी दि.२९ रोजी पार पडला.आमदार दीपक चव्हाण यांच्या फंडातून या बुद्धीविहाराचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.या बुद्धीविहाराचे उद्घाटन फलटण कोरेगाव चे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे व किसनविर कारखान्याचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना किसनवीर कारखाना शेअर्स खरेदी संदर्भात नीतीन काका पाटील यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला आमदार दीपक चव्हाण,जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील,जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे साहेब,सुरेश बापू साळुंखे,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब सोळस्कर,माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, संजय नाना साळुंखे, नवनिर्वाचित किसन वीर कारखाना संचालक ललित मुळीक,किसनविर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद दादा शिंदे,सोळशी प्रभारी सरपंच आकाश सोळस्कर उत्तर कोरेगाव राष्ट्रवादी चे प्रमुख नेते कार्यकर्ते, सोळशी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























