महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जंरडेश्वर साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की, यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
संभाजी घोरपडे असं मृत कामगाराचं नाव आहे. जखमी कामगारांवर कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेली माहिती अशी की, जरंडेश्वर साखर कारखान्यात रात्री 10 वाजेच्या सुमारात बॉयलर फुटून भीषण स्फोट झाला. स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्या सहा कामगारांवर कोरेगाव येथील खासगी रुग्णायालय उपचार सुरु आहेत. या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता. बॉयलिंग हाऊसचे स्टीम उघडल्याने हा स्फोट झाल्याची माहिती जखमी कामगारांनी पोलिसांना दिली. या घटनेचा कोरेगाव पोलीस पंचनामा करत आहेत. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये अद्याप करण्यात आली नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.