महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहर पोलीस ठाणे रेकॉर्डवरीलघरफोडी करण्याऱ्या गुन्हेगारास आज कराड कोर्टाने 1 वर्ष कारावासाची शिक्षा व 1000 दंड केला आहे.कराड शहर पोलीस ठाण्यात 286 /2021 हा गुन्ह्याचा रजिस्टर क्रमांक असून भारतीय दंड विधानकलम 457,380 प्रमाणे आरोपी शितल गोरख काळे वय 40 वर्षे रा,ऑगलेवाडी ता कराड जि सातारा यास शिक्षा झालेली आहे आरोपि ने लॉकडॉउन च्या कालावधी मध्ये रात्रीचा घरात प्रवेश करून 70 वर्षे वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी करून पळून गेला.वृद्ध महिला ही विध्यानगर सैदापुर भागात रहाणारी आहे.सदर गुन्हाच्या तपासादरम्यान आरोपिचा शोध घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
JMFC कोर्टाने 1 वर्ष कारावास व 1000 रुपये दंड या प्रकारची शिक्षा आरोपीस सुनावली आहे.वरील गुन्ह्याचा तपास करून कराड शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली API विजय गोडसे कराड शहर पोलीस स्टेशन,पोलीस हवालदार काटवठे कराड शहर पोलीस स्टेशन,पोलीस नाईक संजय जाधव कराड शहर,पोलीस नाईक मारुती लाटणे,पोलीस नाईक विनोद माने तसेच सरकारी वकील शिला नाईक मॅडम (कराड कोर्ट) यांनी यासंदर्भातील कामकाज पाहिले .यामुळे कराड शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.