लोणंद : लोणंद नगरीचे सुपुत्र मोहसीन कय्युम बागवान कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे मुंबई येथे कार्यगौरव व सत्कार सोहळा दिनांक २१ मे रोजी मुंबई येथे पार पडला.
या कार्यक्रमात मोहसीन बागवान यांना पदोन्नती तसेच शासकीय सेवेत देत असलेल्या योगदानाबद्दल अपर राज्य कर आयुक्त म. रा. शौकत अली शेख, राज्यकर सह आयुक्त म.रा. डॉ डेव्हिड अल्वरीस , संचालक महापारेषण, म.रा नसीम कादरी , मा.कुलसचिव मुंबई विद्यापीठ व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा हज कमिटी ऑफ इंडिया डॉ. मकसूद खान यांच्या हस्ते शाल व रोपटे भेट देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मोहसीन बागवान यांनी हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून पाठीवर कौतुकाची थाप आहे. आपले असेच प्रेम माझ्यावर कायम रहावे ही यानिमित्त इच्छा व्यक्त करतो असे सांगून या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.