प्रतिनिधी फलटण
मुरूम तालुका फलटण गावांमधून सोमेश्वर बारामती तालुक्यात प्रवेश करताना पुलाला जोडणारा रस्ता असून अनेक वर्ष या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे
हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येणारा असून या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे या रस्त्यावरून जाताना पावसाळ्यात तर खूप भयंकर त्रास होतो चिखलाचे साम्राज्य कायमच असते सोमेश्वर कारखाना जवळ असल्याने अनेक शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी ,कामगार यांना रोज ये-जा करण्यास याच रस्त्यावरून जावे लागत आहे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा रस्ता जिल्हा परिषदेने लक्ष घालून त्वरित या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे