महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी :
3 फेब्रुवारी-मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूर कराड व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक संपदा हक्क जाणीव जागृती कार्यशाळा घेण्यात आली .
यासाठी पेटंट व डिझाईनचे मूल्यमापक ( मुंबई) , माननीय श्री प्रकाश सिंग हे मार्गदर्शक म्हणून लाभले.त्यांनी बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगितले . तसेच पेटंट, कॉपीराईट , ट्रेडमार्क, डिझाईन, जिग्रोफिकल इंडिकेशन ,इंटिग्रेटेड सर्किट याविषयी माहिती सांगितली. सदर प्रत्येक प्रकारासाठी लागणारी प्रक्रिया तसेच होणारा खर्च त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच बौद्धिक संपदा हक्क कसे जपले पाहिजेत. बौद्धिक हक्क भंग कसा होतो, त्यासाठी कायद्यातील तरतुदी सांगितल्या. प्रशिक्षणार्थींच्या शंकाचे समाधान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.जोशी आर .आर. यांनी काम पाहिले . प्रथम व द्वितीय वर्षाचे बी.एड. प्रशिक्षणार्थी , माजी विद्यार्थी व सर्व प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.
































