प्रतिनिधी कराड ; कराड नगरपालिकेचा गचाळ कारभार पून्हा दिसून आला. काल महाराष्ट्र न्यूज ने केलेल्या बातमीचा इम्पॅक्ट आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर मध्ये दिसला पण? नागरिकांना दाखवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर ची पुढची बाजू ची स्वच्छता करण्यात आली व मागील बाजूची स्वच्छता कोणत्याही प्रकारची झालेले नाही पूर्वी जसे होते तसेच घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचे साम्राज्य अजून आहे तसेच आहे.
या सर्व गोष्टी पाहता कराड नगर परिषद आरोग्य विभागाच्या स्वच्छतेचा नुसता दिखावा करण्यात आला असून नागरिकांच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे काम कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभाग करत आहे. कोरोनाच्या काळात स्वच्छतेवर सर्वात जास्त लक्ष देत असताना कराड नगरपालिका डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराकडे दुर्लक्ष का? असे प्रश्न नागरिकांतून उपस्थित होतोय.