नागठाणे /प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील टिटवेवाडी येथील नवनाथ बाळू माने यांंच्या शेळींच्या शेडवर तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केला. यात एक जखमी तर तीन शेळ्या ठार झाल्या आहेत. या घटनेत या शेतकऱ्याचे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मध्यराञी घडली. यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे.
मध्यराञी तरस सदृश्य प्राण्याने जाळीतून शेडात प्रवेश करुन शेळ्यांच्या गळ्याला चावा घेऊन रक्त पिऊन ठार केले आहे. ही घटना नवनाथ माने यांंच्या सकाळी निदर्शनास आली. ही घटना परिसरातील नागरिकांना समजताच अबालवृध्दांनी पाहण्यास गर्दी केली. शेडात मृत अवस्थेत पडलेली व शेळ्या पाहून उपस्थितांची मने हेलावली.
शेळ्याना मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वनविभागाने सापळा लावून या प्राण्याला पकडून जंगलात सोडावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.