नवारस्ता प्रतिनिधी : पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त पाटण शहरातील रामापूर येथे शिव अल्पसंख्याक सेना व युवासेना पाटण यांचेमार्फत वही वाटप व वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शिव अल्पसंख्याक सेना महाराष्ट्र उपप्रमुख महेबुब भाई शेख, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप क्षीरसागर, शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटिल, युवासेना पाटण विधानसभा प्रमुख अजय देसाई, कारखाना संचालक बाळासाहेब शेजवळ, मा. जि. प. सदस्य बशीरभाई खोंदू, शिवदौलत बैंक संचालक वाय. के. जाधव, शिव अल्पसंख्याक सेना पाटण तालुका अध्यक्ष इरफान सातारकर, युवासेना ता. उपप्रमुख रत्नदिप जाधव, अक्षय कदम, युवासेना ता. समन्वयक सरफराज जमाते, पाटण नगरपंचायत नगरसेविका सौ. आस्मॉ सादिक इनामदार, सौ. शैलेजा मिलींद पाटील, माजी नगरसेवक गणीभाई चाफेरकर, शिवसेना पाटण शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपप्रमुख महादेव खैरमोडे , सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पवार, सलीमभाई इनामदार, मुबारकभाई हकीम, राहुल देवकांत व शिवसैनिक, युवासैनिक, व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक इरफान सातारकर यांनी केले. ते म्हणाले की शिव अल्पसंख्याक सेना शिवसेना पक्षाचाच एक भाग आहे, याचे प्रमुख ध्येय शिवसेना पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविणे असून अल्पसंख्याक लोकांना न्याय मिळवून देणे आहे. लवकरच याचा विस्तार केला जाणार आहे. जयवंतराव शेलार यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिव अल्पसंख्याक सेना व युवासेना यांचा हा उपक्रम स्तुत्य असून पक्षातील सर्वांनी याचे अनुकरण करावे, भविष्यात इरफान भाईंच्या मागे संपूर्ण ताकत उभी करू. तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई साहेब यांनी पाटण शहरासाठी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे, त्यापैकी शादीखाना लवकरच पूर्ण होऊन मुस्लिम समाजाची अडचण दूर होईल. निवडणूकी वेळी जास्त काळ पाटण मथ्ये वास्तव्य होते. त्यामुळे पाटण मध्ये विकास कामांची कमि दिसून आली. त्यामुळेच प्रभाग नं. १३ व १४ मध्ये सर्वप्रथम प्राधान्याने घाट बांधणेसाठी रू. १ कोटी जिल्हा नियोजन मधून देऊ शकलो. गणीभाई व सलीमभाई तसेच सर्व कार्यकर्त्यांना माझे सांगणे आहे की, अजुनही आपल्याकडे रू. १ कोटी रू. पडून आहेत, विकास कामे सांगा व निधी वापरा. म्हणजे एकीकडून तालुक्याचे आमदार नामदार शंभूराज देसाई साहेब व दुसरिकडून जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार दोघांकडूनही पाटण शहरातील विकास कामे करणे सोपे जाईल. बशीरभाई खोंदू म्हणाले की, लवकरच आपल्या पक्षाचा वर्धापन दिन येत आहे, त्यावेळी आपण शिवसेना – शिव अल्पसंख्याक सेना – युवासेना असा संयुक्त कार्यक्रम घेऊ.

सुरेश पाटिल यांनी आपल्या भाषणात इरफान सातारकर यांची प्रशंसा केली, ते म्हणाले कमी वेळेत कार्यक्रम आयोजित करणे व तो पूर्णत्वास नेणे म्हणजे जोक नाही, आणि हे इरफान सातारकर यांनी करून दाखवले. आंम्हास त्यांचा अभिमान आहे. आभार कुलदीप क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी रत्नदिप जाधव, अक्षय कदम , सरफराज जमाते, कुलदीप क्षीरसागर व इरफान सातारकर यांनी परिश्रम घेतले. वही वाटपानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.






















