वाई : एमएचटी सीईटी २०२१ परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून वाईतील दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीपुर्वीच विजयी दिवाळी साजरी केली. यशाची परंपरा कायम राखत २५ विद्यार्थ्यांना ९५ पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर, ५५ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ८५ पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७७ असून १०४ विद्यार्थ्यांनी ८० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
यशाचा हा झमगमाट विद्यार्थ्याचे आयुष्य उजळवणारा आणि दिशा ॲकॅडमीला अधिकाधिक चांगले देण्यासाठी प्रोत्साहीत करणारा असल्याचे सांगत दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितील कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धापरीक्षेचे दडपण न येता सकारात्मकतेने विद्यार्थ्यांनी तयारी करावी यासाठ योग्य दिनक्रम, खेळ, व्यायाम, योग-प्राणायामाच्या मदतीने मन आणि शरीराचा समतोल राखण्याचे मार्गदर्शन दिशा ॲकॅडमी विद्यार्थ्यांना नेहमीच करत असल्याचे कदम यांनी नमुद केले.
दिशातील तज्ञ शिक्षक आणि शिकण्याच्या नवीन पद्धती, पेपर सोडविण्याच्या क्लृप्त्या आणि मुत्सद्दीपणा हे नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचवते. दिशाच्या शिक्षणपद्धतीतील याच वैशिष्ठ्यांमुळे सीईटी, नीट, जेईई परीक्षेच्या तयारीसाठी दिशा ॲकॅडमी अनेक पालक व विद्यार्थी प्राधान्यक्रम असल्याचे दिसून येत आहे.
दिशातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी कौतुकाची थाप देत दिशातील शिक्षकवर्ग, कर्मचारी व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.