कराड : भारत चीन यांच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत -चीन बॉर्डर
चीनची वारंवार होणारी घुसखोरी
रोखणारे भारतीय सैनिक त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतीय सीमेवर खडा पहारा देत चीनच्या होणाऱ्या घुसखोरी भारतीय सैनिक तसेच सैनिक इन्फंट्री रेजिमेंट आशिष अशोक पोवार यांचे कराड मध्ये आगमन झाले. कराडकर यांच्याकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रियदर्शनी उद्योग समूहाचे प्रमुख अशोक पाटील, नगरसेवक निशांत ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते,
सुनील थोरवडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड, शहराध्यक्ष सागर बर्गे, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, सुरेश लादे, प्रशांत थोरवडे, डॉ. सतीश थोरवडे, सुरज थोरवडे, सुमित थोरवडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे, माजी सैनिक बबन भंडारे, कराडमधील मान्यवर युवक व ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.