आणिबाणी काळात लोकशाही,मानवी स्वातंत्र्यासाठी लढा उभारलेल्या स्वातंत्र्यसेनानीचा कराड येथे मीसाबंदी गौरव सन्मान.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती.इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका व अमर्यादित काळाकरता पुढे ढकलल्या.
जयप्रकाश नारायण,अटल बिहारी वाजपेयी,जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते.या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आणीबाणी काळात लोकशाही व मानवी स्वातंत्र्यासाठी आणीबाणी लढा उभारलेल्या नागरिकांचे आत्मकथन व सन्मान सोहळा श्री सुदर्शन पाटसकर उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आणि मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित केला.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो स्वयंसेवकांवर दडपण आणले. त्यांना अटक केली त्या काळात ज्यांनी देशसेवा म्हणून कारावास भोगला.त्यांचा आज 25 रोजी या आणीबाणीचा काळा दिवस म्हणून भारतीय युवा मोर्चा कराड च्या वतीने “मीसाबंदी गौरव सन्मान” कन्याशाळा,मंगळवार पेठ कराड येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सुदर्शन पाटसकर उपाध्यक्ष भा.ज.यु.मो. महाराष्ट्र प्रदेश,विष्णू काका पाटसकर,डॉ मिलिंद पेंढारकर,विजयराव जोशी,प्रमोद शिंदे,सीमा घार्गे,राहुल चव्हाण,स्वाती पिसाळ,सागर आमले,प्रवीण शिंदे,सागर साळुंखे,अमित पाटील,सर्वेश उमराणी आदी कार्यकर्ते व लोकतंत्रसेनानी उपस्थित होते.