स्वराज अकॅडमिक हाइट्स ओगलेवाडी आयोजित गुणवंत गुणगौरव पुरस्कार
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहराला गुणवत्ता शिक्षणाची मोठी परंपरा आहे.आजवर कराड शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल अनेक अस्सल हिरे या ग्रामीण भागातून देशाला मिळाले आहेत.आणि हे अस्सल हिरे शोधून त्यांना लकाकी आणायचे काम अनेक शैक्षणिक संस्था करत असतात. कराड शहर असो किंवा आसपासचा ग्रामीण भाग एकंदरीतच सर्वच क्षेत्रात आपले नाव कष्टाने पुढे आणणारे अनेक विद्यार्थी आहेत.
एकविसाव्या शतकात मोबाईल क्रांती इतकी वाढली आहे की एखादी गोष्ट सातासमुद्रापार निर्माण होत असेल तर तिची सर्व माहिती दुसऱ्या सेकंदात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पहावयास मिळते. अशा स्पर्धात्मक युगात शैक्षणिक सामाजिक तसेच अनेक क्षेत्रात जी कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे, त्या चढाओढीत टिकून राहायचं असेल तर स्वराज्य अकॅडमिक हाइट्स या शैक्षणिक संस्थेचा उल्लेख करावाच लागेल.मागील अनेक वर्षांपासून स्वराज अकॅडमिक हाइट्स ओगलेवाडी येथे कार्यरत आहे. या संकल्पनेचे जनक श्री. संकेत वाणी हे आहेत.त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सो.सोनाली संकेत वाणी या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज अकॅडमी हाइट्स इथे आपले योगदान देतायत.गेली दोन वर्षे कोरूना च्या महामारी मुळे गुणवंत गुणगौरव पुरस्कार घेता आला नाही. पण यावर्षी स्वराज अकॅडमिक हाइट्स ओगलेवाडी आयोजित गुणवंत गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा 2022 मोठ्या थाटामाटात वेणूताई चव्हाण सभाग्रह, कराड येथे 25 जून रोजी पार पडला.
यावेळी सन 2021-22 या शैक्षणिक कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात व समाजात नावलौकिक वाढवणाऱ्या गुणगौरवांचा सत्कार घेण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुधीर चिवटे (महाराष्ट्र शासन कृषी भूषण पुरस्कार विजेते), मा. श्री.दत्तात्रय पाटील (संचालक प्रितीसंगम क्रिडा प्रबोधनी कराड), मा. सौ. स्मिता पवार( संचालिका दिशा फॅशन इन्स्टिट्यूट), मा.श्री. सचिन बोडरे सर (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक), मा.दीप्ती अदलापुरे (आयटी विभाग), मा. श्री. मधुकर अदलापुरे मा. मुख्याध्यापक आर.बी. मोर.हायस्कूल दासगाव ता. महाड जि. रायगड याच बरोबर कराड शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.