मुंबई – शिवसेनेशी बंड करीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन आसाम मध्ये गेले आहेत. शिंदे यांच्या बंडखोरीला सात दिवस पूर्ण झाला आहे तरीसुद्धा अजून यावर तोडगा निघालेला नाही.
आता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिंदे गटाने एक मोठा दावा केला आहे. 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे असा दावा याचिकेत केला आहे. तसेच राज्यपालांना आम्ही सरकराचा पाठिंबा काढत आहोत असे पत्र देखील राज्यपालांना पाठवलेले आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांनी दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडील सर्व खाती काढण्यात आली आहेत. या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढण्यात आले नसले तरी त्यांना बिनखात्याचे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे काम जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्र्याकडील खातेवाटपात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आली आहे
– एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे.
,-गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे देण्यात आले आहे.
– दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे.
– उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल पुढीलप्रमाणे बदल करण्यात आली आहे
शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),
राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)
अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)